कपाशी (कापूस) लागवडीनंतर ह्या तणनाशकची फवारणी करा.दोन महिने गवत उगणार नाही-kapus favarni
![]() |
Kapus favarni |
कपाशी लागवडीनंतर या तन नाशक ची फवारणी करा. दोन महिने गवत उगणार नाही (kapus favarni)
नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस लागवडीनंतर कोणत्या तन नाशकची फवारणी करावी म्हणजे शेतात गवत उगणार नाही. तर कोणते तन नाशक चांगले असते. एकरी वापरण्याचे प्रमाण किती हे सर्व माहिती आपण या लेखातून जाणून घेऊया.
मित्रांनो जसे आपण सोयाबीन पेरणीनंतर 48 तासात किंवा 72 तासात तन नाशिकची फवारणी करतो. आता तसेच कापूस लागवडीनंतर 48 तासात तन नाशक फवारणी करू शकतात जेणेकरून खुरपणीचा वेळ व मजुरी वाचन ते पण दोन ते तीन महिने गवत उगत नाही. Kapus favarni
मित्रांनो कापूस लागवडीनंतर तन नाशक फवारणीसाठी कोणत्याही कंपनीचा वापरू शकतात पण त्याच्यात पेंडीमेथलीन 38.7 % (pendimethanil 38.7 %) घटक असला पाहिजे. हा घटक कोणत्याही कंपनीच्या तन नाशक मध्ये असेल तर ते तुम्ही वापरू शकतात.
मित्रांनो कापूस लागवड केल्यानंतर शेतात जास्त प्रमाणात गवत उगत आणि जास्त शेत्र असल्यामुळे खुरपणी करायला खूप वेळ लागतो व मजुरी सुद्धा जास्त लागते म्हणून तन नाशक शेतकऱ्यांसाठी चांगले ठरतंय आणि शेतकऱ्यांचा वेळ पण वाचतोय.
खुरपणीसाठी मजूर वेळेवर भेटत नाही आणि त्यामुळे गवत जास्त वाढते आणि त्याचा परिणाम पिकावर होतो त्यामुळे पिकाचे नुकसान होते.
एकरी किती प्रमाण वापरावे
मित्रांनो कंपनी एक एकरासाठी 150 लिटर पाण्यात 700 एम एल औषध एकत्रित करून फवारणी करावी असे सांगते.
आपण कंपनीने सांगितल्याप्रमाणेच औषधाचे प्रमाण घ्यावे.
फवारणीच्या वेळी ही काळजी घ्यावी
फवारणीच्या वेळी गढूळ पाणी वापरू नये आणि पावसाचे पाणीसुद्धा वापरू नये.
औषधाचे प्रमाण कंपनीने सांगितल्याप्रमाणे घ्यावे कमी यादी प्रमाण घेऊ नये.
कापसामध्ये कोथिंबीर किंवा तू यासारखे पीक असले तरी ही फवारणी करायला चालती. Kapus favarni
Post a Comment