नमो शेतकरी महासंन्मान योजना-namo shetkari yojana

Namo shetkari yojana 

नमो शेतकरी महासंन्मान योजनेला मिळाली मान्यता; GR आला आता मिळणार या शेतकऱ्यांना लाभ

Namo shetkari yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती प्रतीक्षा अता संपली आहे, नमो शेतकरी महासंघ निधी योजना ही महाराष्ट्र राज्यात चालवली जाणारी योजना आहे.

या योजनेबद्दल चा अधिकृत जीआर महाराष्ट्र शासनाने 15 जून 2023 रोजी महाराष्ट्र राज्य शासन निर्णयच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झालेला आहे जीआर हा नमो शेतकरी ही योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना सुरू केल्या असून सदर योजना केंद्र शासनात विहित केलेल्या निकषानुसार आणि या संदर्भात वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त होण्याचा निर्देशाप्रमाणे संदर्भ एकच्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत आहे आणि संदर्भ दोनच्या शासन निर्णयान्वये सदर योजना राबविण्याच्या कार्यपद्धतीत कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे.


मा मित्र मंत्री महोदयांच 2023-2024 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाने अनुदानाची भर काढणारी नमो शेतकरी महासंन्मान निधी ही योजना राबवण्यात ची घोषणा केली आहे. केंद्र शासनाच्या प्रधान मंत्री कृषी सन्मान निधी योजना असताना नमो शेतकरी महासंन्मान निधी योजना राबवून याबाबतच्या प्रस्ताव दिनांक 30 मे 2019 रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे.

Namo shetkari yojana: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजा च्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाने अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासंन्मान निधी योजना सन 2023-24 पासून राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे.

योजने करिता लाभार्थ्याची पात्रता व देय लाभासाठी निकष

सदर योजने करिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना गृहीत धरण्यात यावेत.

पंतप्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत पीएम किसान या पोर्टलवर नोंदणी केलेली असेल व त्याचा लाभ मिळत असेल असे लाभार्थी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी पात्र राहतील. तसेच म्हणजे केंद्र शासनाने पात्रतेबाबत निकषात केलेली बदल ही नमो शेतकरी महा सन्मान निधी च्या लाभार्थ्यांना पण लागू होतील.

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने करिता वेगळा शासन निर्णय मिळण्याची आवश्यकता राहणार नाही.

पी एम किसान पोर्टलवर नवीन नोंदणी केली असेल व त्याचा लाभ मिळत असेल अशा लाभार्थ्यांना पण नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल.

योजनेची कार्यपद्धत

पी एम किसान योजनेच्या पीएफएमएस प्रणालीनुसार प्रत्येक हप्ता वितरण करतेवेळी लाभास पात्र असलेले लाभार्थी नमो शेतकरी महा सनन निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. सगळ्या लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत विकसित करण्यात आलेल्या पोर्टलवरून बँक खात्यात थेट लाभ निधी जमा होईल.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल

पी एम किसान सन्मान(p m kisan yojana) निधी योजनेतील लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी महासंन्मान योजनेचा लाभ त्यांना राज्याच्या निधीतून दिला जाणार असल्याने त्यांनी राज्यासाठी कृषी विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग यांनी आयुक्तपणे योजनेसाठी पोर्टल विकसित करण्याची कार्यवाही करावी.

केंद्र शासनाच्या सहमतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना(namo shetkari yojana) आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे पोर्टल एकत्रित करण्यात यावे. त्यामुळे पात्र असलेल्या लाभार्थ्यांची होणारे बदल त्यांना एकाच पोर्टलवर एकाच वेळी प्रत्यक्षात येईल.

निधी वितरणाची कार्यपद्धत

Namo shetkari yojana: नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेप्रमाणे यांच्या वेळापत्रकानुसार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट आयुक्त कृषी विभाग यांच्यामार्फत लाभ वितरित करण्यात येईल.

No comments

Powered by Blogger.