कुसुम सोलर पंप योजना A टू Z माहिती-kusum solar pump yojana
![]() |
Kusum solar pump yojana |
कुसुम सोलर पंप योजना ऑनलाइन अर्ज कुठे भरावा; A टू Z माहिती (kusum solar pump yojana)
या अभियाना अंतर्गत पाच वर्षात पाच लक्ष पारेषण विरहित सौर कृषी पंप स्थापित करण्यास मंजुरी दिली आहे आणि त्यापैकी पहिल्या वर्षासाठी मंजूर झालेले एक लक्ष पारेषण विरहित सौर कृषी पंप स्थापित करण्यास मंजुरी दिली आहे.
सदर अभियान महाराष्ट्रातील महा ऊर्जा मार्फत अर्जदाराची ऑनलाईन अर्ज मागवून प्रथम येणाऱ्या प्राधान्य दिले जाणार आहे.
प्रधानमंत्री कुसुम-ब या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना 3 एचपी 5 एचपी व 7.5 एचपी क्षमतेचा कृषीपंपासाठी अर्ज करता येतील ही योजना केवळ ज्या शेतकऱ्यांपर्यंत वीज पोहोचले नाही त्यांच्यासाठी.
या योजनेसाठी अनुदान देताना खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के अनुदान दिले जाईल व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप मिळतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. प्रथम अर्ज करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य या तत्त्वावर कृषी पंपाचा लाभ देण्यात येईल.-kusum solar pump yojana
कुसुम सोलर पंप योजनेचे वैशिष्ट्य जाणून घेऊया
या योजनेतील 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्ह्यात बसवल्याने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.
शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 एचपी, 5 एचपी ,7.5 एचपी व त्यापेक्षा जास्त एचपी साठी पंप उपलब्ध होणार आहे.
खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांची कृषी पंप किमतीच्या दहा टक्के तर अनुसूचित जाती अथवा जमाती लाभार्थ्यांना पाच टक्के लाभार्थ्याचा हिस्सा राहील.
स्वखर्चाने वेगळे वीज उपकरणे लावण्याची सोय राहील.-kusum solar pump yojana
कुसुम सोलर पंप योजनेचे काही ठळक निकष
विहीर, बोरवेल, शेततळे, बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार.
ज्या शेतकऱ्यांपाशी वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
अटल सौर कृषी पंप योजना टप्पा एक व दोन किंवा मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनेतील अर्ज केलेली पण ते मंजूर न झालेली अर्जदार.
एक हेक्टर जमीन शेत जमीन धारकास 3 एचपी डीसी सौ पंप दोन हेक्टर शेत जमीन धारकास 5 एचपी डीसी सौर पंप व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 एचपी डीसी सौर पंप.
कुसुम सोलर योजना लागणारे कागदपत्रे
शेतकऱ्यांना फक्त खालील दिलेली रक्कम भरावी लागणार आहे
- खुल्या प्रवर्गातील - 19380/-
- अनुसूचित जाती व जमाती - 9690/-
- खुल्या प्रवर्गातील - 26975/-
- अनुसूचित जाती व जमाती - 13488/-
7.5 एचपी साठी
- खुल्या प्रवर्गातील - 37440/-
- अनुसूचित जाती व जमाती - 18720/-
3 एचपी सौर कृषी पंपाची किंमत रु 1.56 लक्ष
5 एचपी सौर कृषी पंपाची किंमत रु 2.225 लक्ष
7.5 एचपी सौर कृषी पंपाची किंमत रू 3.435 लक्ष
Kusum solar pump yojana
कुसुम सोलर पंप योजनेची काही महत्त्वाचे मुद्दे
या योजनेसाठी केंद्र शासनाकडून 30 टक्के व राज्य शासनाकडून 60/65 टक्के अनुदान दिली जाईल व लाभार्थ्यांचे 10/5 टक्के स्वतः खर्च करावा लागणार आहे.
आपण दाखल केलेल्या कागदपत्रांची प्रत्यक्ष थळी पाहणी करून आपला अर्ज मान्य करण्यात येईल.
प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतर निकषात न बसणारे अर्ज रद्द करण्यात येणार असून त्यासाठी जमा केलेली रक्कम आपण दिलेल्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
आपला अर्ज निकषात बसल्यावर देय रक्कम महाऊर्जाकडे त्वरित जमा करावे यासाठी आपल्या लाभार्थी क्रमांक चा वापर करून आपण ऑनलाइन रक्कम जमा करू शकता.
या तपशील चा दिनांक पासून सात दिवसाच्या आत रक्कम जमाना केल्यास आपला अर्ज अस्वीकार केला जाईल.
Post a Comment