शेत जमीन नावावर करा फक्त 100 रुपयात ते पण दोन दिवसात-vadiloparjit shetjamin navaavar Kashi karaychi
![]() |
Land record |
शेत जमीन नावावर करा फक्त १०० रुपयात ते पण दोन दिवसात
जमिनीची वारसा हक्काने हस्तांतरणाची वाटणी पत्र आता अगदी सोपी पद्धत झाली आहे ते पण कमी खर्चात फक्त शंभर रुपयात करणं शक्य झाला आहे. त्यासाठी शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आलेले होते. परंतु त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विचलितता निर्माण झाल्याने सदरच्या परिपत्रकात काही बदल करण्यात आले आहे.vadiloparjit shetjamin navaavar Kashi karaychi
वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी सुद्धा जास्त खर्च लागत होता, तसेच वडिलांकडून मुलीकडे किंवा मुलाकडे, आईकडून मुलाकडे किंवा मुलीकडे शेत नावावर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होत.
म्हणून शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता महाराष्ट्र शासनातर्फे नवीन आदेश काढण्यात आले आहेत.
आता वडिलांची किंवा आईची शेतजमीन मुलीच्या किंवा मुलाच्या नावे वाटप करण्यासाठी महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 नुसार संबंधित तहसीलदारांना अधिकार देण्यात आले आहेत.
आता वडिलोपार्जित शेतजमीन नावावर करण्यासाठी फक्त शंभर रुपयात करणे शक्य झाले आहे, म्हणूनच शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी झाली आहे.
शंभर रुपयात वडिलोपार्जित शेतजमीन आपल्या नावावर कशी करायची? ते बघूया
पूर्वी वडिलोपार्जित शेत जमीन नावावर करण्यासाठी महसूल मंडळांनी आकारलेला खर्च पूर्ण भरावा लागायचा, तसेच शेतजमीन नावावर करण्यासाठी त्या जुन्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा खूप वेळ वाया जायचा. vadiloparjit shetjamin navaavar Kashi karaychi
परंतु आता फक्त शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरच्या सहाय्याने वडिलोपार्जित शेतजमीन नावावरती करता येणार आहे.
वडिलोपार्जित शेत जमीन नावावर करण्यासाठी तुम्हाला तहसील कडे एक शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवर अर्ज करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला वडिलांची किंवा आजोबांची शेतजमीन कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर करता येईल.
शेतकऱ्याला तहसीलदारांकडे शेत जमीन वाटप करण्याबाबतचा अर्ज करावा लागेल, त्या अर्जात अर्जदार शेतकऱ्याने आपले नाव तसेच इतर वारसदाराचे नाव व पत्ता जमिनीचा वर्ग (जिरायती किंवा बागायती) मालकाशी नाते व जमिनीचे क्षेत्र ही माहिती भरणे आवश्यक आहे.
तसेच शंभर रुपयाचा स्टॅम्पवर जमीन वाटप माहिती भरून त्यावरती अर्जदाराची सही व सर्व वारसदारांची सही करणे आवश्यक आहे.
तर अशा पद्धतीने वडील पार्टीचे जमीन आपल्या नावावर करू शकतात. या पद्धतीने शेतकऱ्याची पैशाची व वेळेची बचत होईल. Vadiloparjit shetjamin navaavar Kashi karaychi
Post a Comment